स्वामी विवेकानंद व्यंगचित्र
स्वामी विवेकानंद व्यंगचित्र

जशी झाडाला पाण्याची गरज असते, जशी लेकराला मायेची गरज असते तसेच मनाला सुंदर अशा सुविचाराची गरज असते. सुविचार आपल्या मनासाठी प्रेरणादायक असतात, सुविचार आपल्याला कमी शब्दात खुप महत्वाच्या गोष्टी सांगतात ज्या आपल्या जीवनाला अधिक उर्जावान बनवतात. जीवन जगावं कस हे शिकवतात.


स्वामी विवेकानंद एक तेजस्वी व्यक्तिमत्त्व. स्वामी विवेकानंद यांचे विचार आज हि तेवढेच सत्य व प्रेरणादायी आहेत जेवढे ते पूर्वी होते. या लेखामध्ये आपण स्वामी स्वामी विवेकानंद यांचे विचार पाहणार आहोत. आयुष्यात कधीही खचल्यासारखे वाटले कि स्वामी विवेकानंदांचे विचार आठवावे. आपल्याला नक्कीच त्यातून काही ना काहीतरी मार्ग मिळेल. स्वामी विवेकानंदांचे हे विचार अगदी कमी शब्दामध्ये आपल्याला खूप काही महत्वाच्या गोष्टी सांगून जातात.

" उठा जागे व्हा ! आणि तोपर्यंत थांबू नका जोपर्यंत तुमचे ध्येय मिळत नाही."

" असं कधीच म्हणू नका की,मी करू शकत नाही. कारण तुम्ही अनंत आहात, तुम्ही कोणतीही गोष्ट करू शकता. "

" जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही तोपर्यंत देवालाही तुमच्याबाबत विश्वास वाटत नाही. "

" आत्मविश्वास ही अशी शक्ती आहे, जी तुम्हाला पायथ्यावरुन शिखरावर पोहोचवू शकते. "

" जी लोकं नशीबावर विश्वास ठेवतात ती लोकं भित्री असतात. जे स्वतःचं भविष्य स्वतः घडवतात तेच खरे कणखर असतात. "

" कशाचीही भीती बाळगू नका तुम्ही आश्चर्यकारक काम कराल निर्भयता हे एका क्षणात अंतिम आनंद आणते. "

" आपण जसे विचार कराल तसे व्हाल. आपण स्वत: ला कमकुवत समजले तर  कमकुवत आणि सामर्थ्यवान समजले तर आपण सामर्थ्यवान व्हाल. "

" स्वतःला परिस्तिथीचे गुलाम समजू नका तुम्ही स्वतः चे भाग्यविधाते आहात. "

" जे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते  विषसमजून त्यागुण द्या. "

" जर स्वत: वर विश्वास ठेवणे अधिक शिकवले गेले असेल आणि अभ्यास केला असता तर मला खात्री आहे की बर्‍याच वाईट गोष्टी आणि दु: खांचा नाश झाला असता. "

" इतरांवर अवलंबून राहणे शहाणपणाचे नाही . शहाण्या माणसाने स्वतःच्या पायावर उभे राहून काम केले पाहिजे. हळू हळू सर्व काही ठीक होईल. "

" आपल्याकडे आधीपासूनच विश्वाच्या सर्व शक्ती आहेत. तरी लोक डोळ्यावर हात ठेवतात आणि मग आयुष्यात किती गडद अंधार आहे याबद्दल ओरड करतात. "

" जग एक विशाल व्यायामशाळा आहे जिथे आपण स्वतःला सामर्थ्यवान बनविण्यासाठी आलो आहोत. "

" हजार वेळा ठेच लागल्यानंतरच एक चांगलं चरित्र निर्माण होतं. "

" स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही उलट तुमची आत्मा आहे. "

" स्वतःचा विकास हा तुम्हाला स्वतःहूनच करावा लागेल. ना कोणी तुम्हाला तो शिकवतो ना कोणतंही अध्यात्म तुम्हाला घडवू शकतं. कोणीही दुसरं शिक्षक नाही उलट तुमची आत्मा आहे. "

" जे कोणी आपल्याला मदत करतात त्यांना विसरू नका. जे कोणी आपल्यावर प्रेम करतात त्यांचा द्वेष करू नका आणि जे कोणी आपल्यावर विश्वास ठेवतात त्यांना फसवू नका. "

" आयुष्यात जोखीम घ्या. जर तुम्ही जिंकलात तर तुम्ही नेतृत्व करू कराल आणि जर तुम्ही हरलात तरी तुम्ही मार्गदर्शन तर नक्कीच करू शकता. "

" नायक बना. नेहमी स्वतःला म्हणा, मला भीती वाटत नाही. "

“आपण आयुष्य असेपर्यंत शिकणे ”- अनुभव हा जगातील सर्वोत्तम शिक्षक आहे.

" भयातून दुख निर्माण होते, भयापोटी मृत्यू येतो आणि भयातूनच वाईट गोष्टी निर्माण होते. "

" आपले मन आपल्या लाडक्या मुलाप्रमाणे असते, ज्या प्रमाणे लाडकी मुले नेहमी असंतुष्ट असतात. त्या प्रमाणे आपले मन नेहमी अतृप्त असते म्हणूनच मनाचे लाड कमी करा, व त्याला सतत लगाम घाला. " 

" मेंदू आणि ह्रदय या दोघात संघर्ष चालु असेल, तर नेहमी ह्रदयाचे ऐका. "

" आपण जे पेरतो ते घेतो. आपण स्वतःच स्वतःच्या नशिबाचे निर्माता आहोत. "

" दिवसातून एकदा तरी स्वत: शी बोला, अन्यथा आपण या जगातील एका उत्कृष्ट व्यक्तीला हरवून बसाल. "

" परमेश्वर नेहमी कृपाळूच असतो जो अत्यंत शुद्ध अंत:करणाने त्याची मदत मागतो त्याला ती निश्चितपणे मिळत असते. "

“अगदी सरळमार्गी असणे हेही एक प्रकारचे पापच आहे.हे पाप कालांतराने मनुष्याच्या दुर्बलतेचे कारण बनते . “

" मेंदूच्या शक्ती सूर्याच्या किरणांसारखेच असतात. जेव्हा ते केंद्रित असतात तेव्हा ते चमकतात. "

" चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय. " 

" जर पैशाने इतरांचे कल्याण करण्यास मदत केली तर त्याचे काही मूल्य आहे, अन्यथा ते केवळ वाईटाचे ढीग आहे आणि जितक्या लवकर त्यातून मुक्त होईल तितके चांगले. "

" वास्तविक यश आणि आनंद घेण्याचे सर्वात मोठे रहस्य म्हणजे – त्या पुरुषाने किंवा स्त्रीने जे त्या बदल्यात काहीही मागत नाही. पूर्णपणे निस्वार्थी व्यक्ती सर्वात यशस्वी असतात. "

" हे जग आहे; आपण एखाद्यास उपकार दर्शविल्यास, लोक त्याला महत्त्व देत नाहीत, परंतु आपण ते काम लवकरात लवकर थांबविल्यास, ते त्वरित आपल्याला कुटिल सिद्ध करण्यास मागेपुढे पाहणार नाहीत. माझ्यासारख्या भावनिक लोकांना त्यांच्या प्रेमळ लोकांनी फसवले आहे. "

" धन्य आहेत ते शरीर इतरांची सेवा करण्यात नष्ट होते. "

" जे इतरांसाठी जगतात तेच जगतात. "

" सर्वात मोठा धर्म म्हणजे आपल्या स्वभावाप्रती खरं असणं. स्वताःवर विश्वास ठेवा. "

" कोणाचीही निंदा करू नका. जर तुम्ही कोणाच्या मदतीसाठी हात पुढे करू शकत असाल तर नक्की करा. जर ते शक्य नसेल तर हात जोडा आणि त्यांना आशिर्वाद द्या आणि त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. "

" सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये. "

" धन्य आहेत ते लोकं जे दुसऱ्यांच्या सेवेसाठी आपलं आयुष्य खर्च करतात. "

" ज्या वेळी तुम्ही काम करण्याची प्रतिज्ञा कराल, त्याचवेळी ते केलं ही पाहिजे, नाहीतर लोकांचा तुमच्यावरील विश्वास नाहीसा होईल." 

" जर स्वतःवर विश्वास ठेवणं आणि अधिक विस्तृतपणे शिकवणं आणि अभ्यास घेण्यात आला असता तर मला विश्वास आहे की, वाईट आणि दुःखाचा एक मोठा भाग गायब झाला असता. "

" आपल्याला अशा शिक्षणपद्धतीची गरज आहे जे काळाला अनुसरून असेल. "

" आपल्या दुर्दशेचं कारण नकारात्मक शिक्षा प्रणाली आहे. "

स्वामी विवेकानंद यांनी युवकांना त्यांच्या जीवनातील अनुभवांवरून खूप काही शिकविण्याचे प्रयत्न केले आहेत. त्यांचे विचार माणसात नवीन प्रेरणा निर्माण करतात, आपण या विचारांना सोशल मीडियावर शेयर करू शकता, स्वामी विवेकानंद यांचे प्रेरणादायी विचार