" या महाराष्ट्रामधल्या शहरांमध्ये आज किती लोक येतात, कूठून येतात, काय करतात, कूठे राहतात कशाचा कशाला ठाम पत्ता नाही, किती गुन्हेगार या राज्यामध्ये येतात आणि एवढा सगळा लोंढा म्हणजे जवळपास आज या क्षणाला महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यामधुन रोज 48 ट्रेन येतात, ज्या महाराष्ट्रात इतरत्र सगळीकडे पसरतात, येताना भरून येतात जाताना रिकाम्या जातात, ही कोण माणसं येतात, कुठून येतात, ही माणसं काय करतात ही कुठे राहतात, ह्यांना काम कोण देतय, यातले गुन्हेगार किती आहे,काय आहे, ह्याचा कशाचा कशाला पत्ता नसताना फक्त आमच्या या लोकांमूळे पोलीस अधिकाऱ्यांमूळे आज अजूनही शांतता आणि सुव्यवस्था आहे म्हणून ही माणसं खूप मोठी आणि महत्त्वाची.
आपल्याकडे अचानक एखादी गोष्ट घडल्यावर पोलीसांना शिव्या देन सोप असतं हो, परंतु ते कशातून जात असतात, आमचा एखादा साधा कॉन्स्टेबल ज्यावेळेला असतो, तो दिवसरात्र ज्यावेळी दांडूका घेऊन ऊभा असतो, आम्ही काय त्यांची चेष्ठा करतो, हा काय दांडूका घेऊन ऊभा आहे. अहो तो ऊभा आहे, एकदा ऊभे राहून दाखवा ना तसं, त्यांना सण नाही, बायका मूलं नाही, काही नाही, आम्ही फक्त बोलणार हा ह्यांना फक्त पैसे खायला पाहिजे, पैसे खायचा काय फक्त एकटा हवालदार खातो काय. म्हटलं तर अख्खा देश खातो, मग शिव्या त्यांना का नाही देत, कॉन्स्टेबलला का? पण तो जेवढी मेहनत करतो, तो जेवढा पाहरा देतो हा पाहरा देण ही काय सोप्पी साधी गोष्ट नाही. म्हणून हे खातं हे पोलीस खातं हे काय साधं सोप्प खातं नाही आहे. "

।। राजसाहेब ठाकरे ।।