मुलीच्या नादाला नको लागु सांगत होती आई
त्यावेळी नकळत पणे मीच तिचे ऐकले नाही।। 
माझंच तिच्यावर अन् तिच दुसऱ्यावर होत प्रेम
खुप काही केल तिच्यापायी अन् तिने दुसऱ्यापायी
मनापासून केल मीच तिच्यावर प्रेम अन् तिन दुसऱ्या वर
मीच मात्र जगत होतो तिच्या प्रेमाच्या आशावर
मीच मानतो तिला माझी प्रिय सोनु
पण ती दुसऱ्यालाच म्हणते तिचा जानु
मुलीच्या नादाला नको लागु सांगत होती आई
त्यावेळी नकळत पणे मीच तिचे ऐकले नाही ।। 
ती दिसायला होती प्रेमळ साधी भोळी 
पण भाजत होती दोन्हीकडे पोळी
तिच्या बोलण्यावर हसण्यावर लावतो मीच लळा
अन् ती मात्र कळुन न कळल्यासारख  कसा कापते माझाच गळा
मी समजत होतो तेवढी सोपी नाही प्रेमाची शाळा
एकतर्फी प्रेमाचा शेवटी कोरडाच राहतो फळा 
जी लावेल तुम्हाला जीव तुम्ही तिच्याच  मागे पळा
उगाच लावु नका हो एकतर्फी प्रेमाचा मळा
मुलीच्या नादाला नको लागु सांगत होती आई
त्यावेळी नकळत पणे मीच तिचे ऐकले नाही।।