नाव त्याचे घेता, जीव आसवावा
अंतरी कळावा, स्पर्श त्याचा ...
त्याच्या ओंजळीत, प्रारब्ध भरले,
कणाकणात नांदतो, वास त्याचा...॥
साखरेतली गोडी जशी अनुभवता येते, पण भौतिकदृष्ट्या दाखवून देता येत नाही, अगदी तसेच पांडुरंगाचे अस्तित्व ही पण अनुभवायची गोष्ट आहे. देव चराचरात भरला आहे, तो झाडावेलीत, पशुपक्ष्यात आणि प्रत्येक जिवंत माणसात आहे. पण असे नुसते म्हणून उपयोग नाही तो ओळखता यायला हवा. म्हणतात ना - "अनंत रुपात उभा समोरचि! सोडून धुंडीसी देव कुठे?"
0 टिप्पण्या