।।आई।। 
माझ्या ध्यानी मनी वसलीस तु आई
तुझाच विचार चालु असतो माझ्या मनी।। 
अन् कधी मधी तुझी हाक ऐकू येते कानी
नेहमीच वाटते मला घेऊन जावे तुला आनंदी, स्वच्छंदी, निसर्गरम्य फुलांच्या वनी
तेथील सारी फुले तोडून अर्पण करावी तुझ्या चरणी ||
माझ्या ध्यानी मनी वसलीस तु आई
तुझाच विचार चालु असतो माझ्या मनी।। 
तुझा प्रेमळ आवाज घुमतो माझ्या कानी 
तुझ्यापासून दुर असल्यावर वाटते मला अनाथ
जेव्हा मी नऊ महिने होतो तुझ्या उदरात
तेव्हा तु किती सहन केल्या यातना अतोनात
हे प्रत्येकाने आयुष्यभर ठेवले पाहिजे ध्यानी ||
हाताच्या बोटाला धरुन चालायला अन् बोलायला शिकवलं
कसेही, कधीही, कोठेही प्रथम तुझ्या बाळाचे पोट भरवल
वेळप्रसंगी स्वतः उपाशी तु राहती
गरज पडली तर देवापुढे बाळासाठी भिक्षुक बनतेस 
एक एक घास भरवुन अंगाई तु गातेस
निज निज बाळा  म्हणुनी कुशीत घेतेस
बाळासाठी जगाशी वैर तु घेतेस
कितीही, काहीही वाईट जरी केल
तरी तु शेवटी मुलाच्या पाठीशी उभी राहतेस
मुलाला शिकवण्यासाठी भांडीकुंडी पण धुते
माझ्या ध्यानी मनी वसलीस तु आई
अशीच गात रहा माझ्यासाठी अंगाई
ईश्वर चरणी करतो प्रार्थना
माऊलीला तिच्या बाळापासून दुरावून नको देऊस तिला यातना ||
अन् मी सुद्धा होऊ देणार नाही कधी दु:खी तुला आई ||
जसा मी तुझ्यासाठी तशीच तु माझ्यासाठी आहेस गं सर्वकाही,
माझ्या ध्यानी मनी वसलीस तु आई
तुजविण मला करमत नाही
माझ्या ध्यानी मनी वसलीस तु आई ||

- शनी देशमुख