रायगडा वंदन करतो तुजला
माझ्या राजापुढे नतमस्तक होऊ दे मजला
शिवशंभू राजे झाले रयतेचे राजे झाले
तेव्हा किती छान होतास रे तु सजला
रायगडा वंदन करतो तुजला ||
शिवबांनी ऊभा केलेला महाराष्ट्र तु पाहिला
किती मावळ्यांनी त्यासाठी स्वत:चा प्राण वाहिला
तूच तर त्यांच्या पाठिशी शेवटपर्यंत उभा राहिला
त्या स्वराज्याची राजधानी तुला केली 
तुझ्या रक्षणासाठी बहुत मावळ्यांनी प्राणाची आहुती दिली
रायगडा वंदन करतो तुजला
माझ्या राजापुढे नतमस्तक होऊ दे मजला ||
लढाया जिंकण्यासाठी गनिमी कावा तुझपाशी शिजे
अन् जिंकुन आल्यावर सनई चौघडे वाजे
आनंदाने रायगडा तु फुलांच्या तोरणांनी सजे
रायगडा वंदन करतो तुजला
माझ्या राजापुढे नतमस्तक होऊ दे मजला ||
शिवबा गेल्यावर तु दिलास शंभुराजांना   दिलासा,
तुझापाशीच झाला राजद्रोह्यांचा खुलासा
जोवर होती शंभुराजांवर तुझी छाया 
सर्व शत्रुंचे वार गेले वाया
रायगडा वंदन करतो तुजला
माझ्या राजापुढे नतमस्तक होऊ दे मजला ||
तूच पाहिले शंभुराजां विरोधात केलेले कट कारस्थान
अन् शंभुराजांनी केलेल्या त्याचे उच्चाटन
नव्हते शंभूराजे रायगडी म्हणुनी खूप मोठा कट शिजला
अन् घातली
दुश्मनांनी संगमेश्वरी राजांना बेडी 
तेव्हा रायगडा किती अश्रू अनावर झाले तुजला
रायगडा वंदन करतो तुजला ||
माझ्या राजापुढे नतमस्तक होऊ दे मजला
शिवशंभू राजे झाले रयतेचे राजे झाले
तेव्हा किती छान होतास रे तु सजला
रायगडा वंदन करतो तुजला
रायगडा वंदन करतो तुजला ||

- शनी देशमुख