मैत्री'

प्रत्येकाच्या जीवनामध्ये 'मैत्री' असावी, 
पण तिला कशाचीही तडजोड नसावी ||
आपल्या नात्यामधला असते ती दुवा,
अन् आपण ही तो निर्मळ मनाने जपायला हवा ||
खुप आनंद होतो पाहताना आकाशात उंच उडणाऱ्या पक्ष्यांचा थवा,
अन् आपल्या मैत्रित ही उंच भरारी घेण्याचा असावा एक उमंग नवा ||
सतत घेत असते मैत्री आपली परीक्षा,
पण ती असते आपल्याला भेटलेली एक उत्तम शिक्षा ||
संकट काळी 'फुल न फुलाची पाकळी' बनुन उचलते ती खारीचा वाटा,
खुप दुःख होईल प्रत्येकाला जेव्हा येईल तिच्यात कटुता ||
प्रत्येकाच्या जीवनामध्ये 'मैत्री' असावी, पण तिला कशाचीही तडजोड नसावी ||
पण तिला कशाचीही तडजोड नसावी ||