बाबासाहेब आंबेडकर व्यंगचित्र
बाबासाहेब आंबेडकर व्यंगचित्र

Must Read (नक्की वाचा):

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार


     बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार    


" राजकीय पक्षांनी स्वतः च्या तत्वप्रणालीला देशापेक्षा मोठे मानले, तर स्वातंत्र्य धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. "

 

         " जे सरकार योग्य आणि त्वरित निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी करु शकत नाही, त्याला सरकार म्हणवुन घेण्याचा अधिकार नाही, अशी माझी धारणा आहे. "

 

         " देशामध्ये एकच पक्ष असणे हे देशाच्या उन्नतीला हितावह नाही. ज्या देशामध्ये एकापेक्षा अधिक राजकीय पक्ष नाहीत, तेथे बुद्धीची वाढ होणे शक्य नाही जेथे बुद्धीची वाढ शक्य नाही तेथे स्वातंत्र्य मिळणे अशक्य आहे. "

 

         " अस्पृश्यांची समस्या म्हणजे प्रचंड हिमालय आहे.या हिमालयाला टकरा मारुन मी माझे डोके फोडुन घेणार आहे. हिमालय कोसळला नाही, तरी माझे रक्तबंबाळ डोके पाहुन सात कोटी अस्पृश्य लोक तो हिमालय जमीनदोस्त करण्यास एका पायावर तयार होतील त्यासाठी प्राणार्पण करतील, हे तुम्ही पक्के ध्यानात ठेवा. "

 

         " देशाच्या हितासाठी मी आपले वैयक्तिक हित सोडुन देण्यास तयार आहे, पण अस्पृश्य समाजाचे हित सोडण्यास मात्र तयार नाही. कोणाला ती जात्यंधता वाटली तर खुशाल वाटो. "

 

         " तुम्ही आपले कर्तव्य ओळखा, काळ कोणता आला आहे हे ध्यानात घ्या बदलेल्या परिस्थितीत आपल्याला काय केले पाहिजे याची जाणीव ठेवा.जुन्या चालीरीती टाकून , नव्या चालीरीती तुम्ही घालुन घ्यावयास पाहिजे आहेत. "

 

       " माझ्याविषयी कोणी काहीही म्हणतो, मला त्याची पर्वा नाही, परंतु आपण जी क्रांती केली आहे ती एक मोठी क्रांती आहे, हे आपण विसरता कामा नये. "

 

         " अस्पृश्य समाजात प्रथम स्वाभिमान निर्माण करणे हे कार्य मला पृथ्वीमोलाचे वाटले. केवळ माझे नाव घेऊन जयजयकार करण्यापेक्षा जी गोष्ट माझ्या दृष्टीने अत्यंत मोलाची आहे ती करण्यासाठी प्राणाच्या मोलाने झटापट. "

 

         " माझे जीवनविषयक तत्वज्ञान तीन शब्दात समुर्त झालेले आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव. फ्रेंच राज्यक्रांतीवरुन जीवनविषयक तत्वज्ञान मी उसने घेतले आहे असे मात्र कोणी समजु नये. माझ्या तत्वज्ञानाचे मुळ राजकारणात नसुन धम्मात आहे. माझे गुरु तथागत गौतम बुद्ध यांच्या शिकवणीतुनच हे तत्वज्ञान मी स्वीकृत केले आहे. "

 

         " दुसऱ्याला ईश्वर बनवायचे आपल्या उद्धाराचा भार त्याच्यावर टाकायचाही भावना तुम्हास कर्तव्यपराङमुख करणारी आहे. या भावनेला जर चिटकून बसलात तर तुम्ही प्रवाहाबरोबर वाहणारे लाकडाचे ओंडके बनुन, तुमच्या अंगी वास करीत असलेली शक्ती निकामी ठरेल. "

 

         " संसारमध्ये मनुष्याला जी सुख दुःख भोगावी लागतात ती ईश्वरी इच्छेने होतात, आपले दारिद्र्य हे आपणासाठीच आहे असे लोक मानतात. त्यासाठीच सगळ्यांनाच मला हे सांगावयाचे आहे, की ही अशी स्वतः ला नीच समजण्याची भावना सोडुन द्या. "

 

         " मला इमानदार लोंकाची गरज आहे, ज्ञानाची कमी मी भरुन काढेन. "

 

         " मी प्रथमता भारतीय आणि अंतिमता सुद्धा भारतीय आहे. "

 

    " मताची मिळाला अधिकार हे तुमच्या मुक्तीचे साधन आहे, मिळालेले मुक्तीचे साधन जर तुम्ही पैशावारी विकाल तर मग तुमच्यासारखे आत्मघातकी, समाजद्रोही मुर्ख तुम्हीच. यासाठी बंधु आणि भगिनींनो कोणत्याही स्थितीत तुम्हास मिळालेला हा अधिकार पैशावारी विकु नका. "

 

 " उपासमारीने शरीराचे पोषण कमी झाल्यास माणुस हीनबल होवुन अल्पायुषी होतो. तसेच शिक्षणाच्या अभावी तो निर्बुद्ध राहिल्यास जिवंतपणी दुसऱ्याचा गुलाम बनतो. "

 

 " भारतीय राजकारणात व्यक्तीपुजा अगर भक्तीचा एवढा प्रभाव आहे की, इतर कोणत्याही देशातल्या राजकारणात अशी भक्ती अशी व्यक्तीपुजा कोठेही आढळणार नाही. धर्मात भक्तिमार्ग हा मुक्तीमार्ग बनु शकतो. परंतु राजकारणात भक्तिमार्ग हा अधःपतनाचा पर्यायाने हुकुमशहीचा निश्चित मार्ग होतो.

 

  " आज जर राष्ट्राला कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ती जनतेच्या मनात एक राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण करण्याची होय, आपण प्रथम भारतीय असुन नंतर हिंदु, मुसलमान, सिंधु किंवा कानडी अशी भावना निर्माण करण्यापेक्षा आपण प्रथमतः भारतीय नंतरही भारतीय आहोत अशी भावना निर्माण केली पाहिजे. "

 

        " जो धर्म एका वर्गाला विद्या शिकू नये, शस्त्र धारण करु नये असे सांगतो, तो धर्म नसुन माणसांच्या जीवनाचे विडंबन आहे. जो धर्म अशिक्षितांना अशिक्षित रहा, निर्धनांना निर्धन रहा, अशी शिकवण देतो, तो धर्म नसुन ती शिक्षा आहे. "

 

         " तुमच्या मताची किंमत मीठ-मिरची इतकी समजु नका. त्यातील सामर्थ्य ज्या दिवशी तुम्हाला कळेल, तेव्हा ते मत विकत घेऊ पाहणाऱ्या इतके कंगाल कोणीच नसेल! "

 

         " लोकशाही सरकार जर भांडवलधार वर्गाच्या हाती पडले तर इतरांना गुलामगिरीतच मरावे लागणार. "

 

         " साम्यवाद हा पसरणाऱ्या वणव्याप्रमाणे आहे. तो सर्वच भस्म करीत जातो. लोकशाही देखील.... "

 

      " मी राष्ट्राची चोख कामगिरी बजावली अशी माझी खात्री आहे, आपण मला देवपदाला चढवु नका, एखाद्या व्यक्तीला देवपदाला चढवून इतरांनी आंधळेपणाने त्यांच्या मागे धावत जावे, है मी तर कमकुवतपणाचे लक्षण मानतो. "

 

         " अधिकाररुढ पक्षाशी अधिकारावरील गृहस्थांशी माझे मतभेद असले तरी त्या करीता देशाची नाचक्की कधीही करणार नाही, समोरासमोर मी मंत्र्याशी किवा सरकार पक्षीय सभासदांशी दोन हात करीन, पण परकीयदेशादेखत किंवा परदेशात त्यांचा मानभंग करणार नाही. "


Must Read (नक्की वाचा):

स्वामी विवेकानंद यांचे विचार 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे प्रेरणादायी विचार

बाळासाहेब ठाकरे यांचे प्रेरणादायी विचार

 

         " स्वाभिमानशुन्यतेने जीवन कंठणे नामर्दपणाचे आहे. जीवनाकरिता स्वाभिमान जागृत ठेवा . आपला आर्थिक तोटा असला तरी आपण प्रथम आपल्या कर्तव्याला जागले पाहिजे. "

 

         " मत विकणे हा तर गुन्हा आहेच, शिवाय तो आत्मघातही आहे. "

 

         " युवकांनी चाळीचाळीत जावुन जनतेचे अज्ञान आणि खुळ्या समजुती दुर केल्या पाहिजे तरच आपल्या शिक्षणाचा लाभ होईल. आपण आपल्या ज्ञानाचा उपयोग केवळ परिक्षा पास करण्यासाठी चालणार नाही, ज्ञानाचा उपयोग आपण आपल्या सुधारणा प्रगती करण्याकरिता केला पाहिजे तरच भारत उन्नतावस्थेत जाईल. "

 

         " प्रामाणिकता , कर्तव्याची जाणिव राष्ट्रीय हिताची दृष्टी ही महाराष्ट्राची परंपरा. "

 

      " आपला शत्रू कोण, मित्र कोण हे ओळखले पाहिजे आणि आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, पुर्वी सारखा एकालकोंडेपणा आता उपयोगी पडण्यासारखा नाही. "

 

       " ज्या समाजात आपला जन्म झाला आहे, त्या समाजाचे उपकार आपण विसरता फेडले पाहिजेत. "

 

         " कामावर जाण्याकरिता वेगळे फिरावयास जाण्याकरिता किंवा लग्नकार्यात जाण्याकरिता वेगळे कपडे करा, दोन वेळेचे खावयास नसले तरी चालेल परंतु चांगले कपडे करा. कारण कपड्यापासुन आज जगात मान आहे. "

 

        " प्रत्येक तरुणाने आशा कधीच सोडु नये. ज्या दिवशी तो आशा सोडिल त्या दिवशीच तो जगात जगला काय आणि मेला काय सारखाच होईल. प्रत्येक तरुणात महत्वकांक्षा असली पाहिजे. महत्वकांक्षेशिवाय मनुष्य धडपड प्रयत्न करुच शकत नाही. "