Jitendra Joshi व्यंगचित्र

" प्रेमात पडलो आम्ही जरी तरी कधीच आम्हाला लागत नाही 
 कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही.. 

कितीक विविधता नवतरुणींची कितीक चांदण्या आकाशी
 रातराणी.. जुई.. जाई.. केवडा.. उगाच दरवळ नाकाशी.. 
चक्कर मारतो बागेत फक्त आम्ही.. सुगंध कधी मागत नाही 
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही.. 

तुझा माया, श्रद्धा, भक्ती, तुझ्या ओठ्यामध्येच मुक्ती 
जीव माघ हसुन देतो करु नकोस लग्नाची सक्ती 
वेळीच देतो तिला इशारा उगाच वेडे वागत नाही 
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही.. 

सोडून जाता आम्हा बालिका विरह वेदना ठणकत बसते.. 
कितीक पहिल्या .. अनुभवल्या.. परि अंती सोबत कूनीच नसते 
समजावतो प्रत्येक वेळी मी मनाला.. उगाच रात्री मी जागत नाही.. 
कारण एकीवर एकदाच प्रेम करून आमचं कधीच भागत नाही.."


- जितेंद्र जोशी