नाही जातिभेद, नाही वर्णद्वेष
सर्व धर्म-पंथ एक होती।
विठ्ठल हाची धर्म, विठ्ठल
हेचि कर्म
विठ्ठल भेटी निघाली, विठ्ठलवारी।।
गजर विठ्ठल, भजन विठ्ठल
नामाचा जयघोष
पदोपदी।
ताल विठ्ठल, नाद विठ्ठल
विठ्ठल व्यापला चराचरी ।।
मुखी नाम विठ्ठल, मुर्ती
डोईवर विठ्ठल
ध्यानी मनी विठ्ठल अवतरला।
आस नयनी विठ्ठल, ध्यास विठ्ठल
विठ्ठल
कायाकायांत विठ्ठल संचारला।।
चैतन्याचा सोहळा, भक्तीचा सागर,
विठ्ठलाचा भास,
मुक्तीची अनुभूती।
विश्वा म्हणे घेऊ, अवघी ती शिकवण
मानवतेचे दर्शन, विठ्ठलवारी ।।
0 टिप्पण्या