" छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हते तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांनी थोर तत्ववेत्त्याच्या शिकवणीतून स्फूर्ती घेतली होती. वैयक्तिक महत्वकांक्षेतून केवळ स्वतःसाठी राज्य स्थापन करण्याची त्यांची इच्छा नव्हती. तत्कालीन राज्य पद्धतीच्या गुणावगुण यांचा त्यांनी अभ्यास केला आणि त्यातून आपले विशिष्ट राज्य धोरण व राज्यव्यवस्था यांची आखणी केली.  महाराज स्वतः धर्मनिष्ठ हिंदू होते, तसेच इतर धर्मांविषयी त्यांची भावना सहिष्णुतेची होती.  इतर धर्मांच्या पूज्य स्थानासाठी त्यांनी इनामे दिली.  छत्रपती शिवाजी महाराज एक एक थोर सेनानी होते.  स्वातंत्र्य रक्षणासाठी आरमाराची आवश्यकता आणि महत्त्व त्यांना पटले होते.  इंग्रज व डच यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी त्यांनी प्रबळ आरमार उभारले. प्रतापगड किल्ल्याच्या बांधणीत त्यांची युद्धशास्त्रातील निपुणता दिसून येते. शिवाजी महाराजांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे तर ते  साक्षात प्रतीक होते."

                                       - पंडित जवाहरलाल नेहरू