" राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या विचारांची श्रेष्ठता, व्यापकता आणि कल्याणकारकता आजच्या काळातही तितकीच समर्पक आहे. आज त्यांचे पुण्यस्मरण करताना त्यांच्या सत्य, अहिंसा, सर्वधर्म समभाव या वैश्विक स्तरावरही अनुकरणीय आणि आचरणीय ठरलेल्या तत्त्वांचा अंगिकार करण्याचे सामर्थ्य आपल्यात येवो, ही धारणा प्रत्येकाने मनात बाळगायला हवी. त्यांच्या विचारांचा वारसा येणाऱ्या पिढ्यांसाठी कायम प्रेरणादायी ठरावा, हीच त्यांच्या स्मृतींना खरी आदरांजली ठरेल. "
#MahatmaGandhi
0 टिप्पण्या