शरद पवार या व्यक्तिमत्त्वाबद्दल राज्यातील प्रत्येकाच्याच मनात कुतूहल आहे. राजकारण, समाजकारण, अर्थकारण इथपासून ते क्रिकेटच्या मैदानापर्यंत सगळीकडे या माणसाची 'वट' आहे. पण हा माणूस कधी काय करेल, कुणीच सांगू शकत नाही. त्यांच्या आत्तापर्यंतच्या वाटचालीतून हेच सिद्ध होतं.
शरद पवारांनी शहरामध्ये केलेली कामे आज ही जागतिक नकाश्यावर ठळक पणे दिसत आहेत, हीच त्यांची कामाची पावती आहे. तुम्हीच बघा ना पुण्या सारख्या शहरातील हिंजवडी आयटी पार्क ची संकल्पना देखील पवार साहेबांच्या विचारतील आहे याचं आयटी पार्क च्या जागे वर साखर कारखाना उभारणी साठी भूमिपूजन समारंभा मध्येच साहेबांनी स्थानिक शेतकर्यांचा विरोध पत्करून आयटी पार्क ची घोषणा केली होती.
त्याकाळात जो विरोध झाला त्याच्या उलट परिस्तिथी आज तिथे आहे. आज हिंजवडी आयटी पार्क मुळे फक्त महाराष्ट्रातील चं नव्हे तर देशातील लोकांना रोजगार मिळालेला आहे.
आशियातील मोठी MIDC म्हणून नावारूपास आलेली पिंपरी चिंचवड एमआयडीसी साहेबांची चं देण आहे बर का आणि इथे आज जगभरातील Jaguar, Mercedez-Benz, Volkswagen, Tata, Mahindra अश्या नामांकित कंपन्या आहेत. जिथे आपल्या महाराष्ट्रातील शहरातील व ग्रामीण भागातील तरुणां ना रोजगार उपलब्ध झालेला आहे.
नवी मुंबई हे शहर वसवण्याचे काम हे पवार साहेबांच्या विचारातून च झालेले आहे. स्मार्ट सिटी च्या नुसत्या गप्पा मारणारे हे सरकार सत्तेत येण्या आधीच नवी मुंबई हे शहर स्मार्ट झालेले होते.
इतिहासात डोकावत असताना एक गोष्ट प्रकर्षाने आठवते शरद पवार कृषिमंत्री असताना कांद्याचे भाव वाढले होते म्हणून पत्रकारांनी त्यांना प्रश्न विचारला होता त्यावर उत्तर देताना हे शेतकरी पुत्र म्हणाले होते शेतकर्यांना पण त्यांच्या मालाला भाव मिळूद्या. एवढे स्पष्ट आणि परखड शेतकर्याच्या बाजूने भूमिका घेणारे मंत्री कदाचित ते एकटेच. आता मात्र सरकार कांदाचा भाव वाढला म्हणून लगेच पाकिस्तान आणि इतर देशातून कांदा आयात करते आहे.
दिल्लीतील एका कार्यक्रमात गेल्या वर्षी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी म्हणाले होते –
भारताला जागतिक स्तरावर अन्न-धान्यात निर्यातदार देश बनविण्यात शरद पवारांचे मोलाचे योगदान आहे. शरद पवार यांचे देशासाठी अनन्यसाधारण योगदान आहे. केंद्रीय कृषीमंत्री म्हणून सलग 10 वर्ष काम करताना त्यांनी देशाच्या शेती विकासासाठी रचनात्मक कार्य केले. एके काळी भारताला तांदूळ आयात करावा लागत असे, देशाची या गंभीर समस्येतून मुक्तता करण्यासाठी पवारांनी वैज्ञानिक व तज्ज्ञांची मदत घेतली. याकरिता शेतकर्यांचे प्रबोधन केले. याचा परिपाक म्हणून जगात प्रथम क्रमांकाचा तांदूळ निर्यातदार देश म्हणून भारताची नवी ओळख निर्माण करून दिली. जागतिकस्तरावर गहू निर्यातीतही देशाला अव्वल स्थानावर पोहचविले.
याच कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते, शरद पवार यांचा मूळ पिंड हा रचनात्मक आहे. त्यामुळेच ते राजकारणातही रचनात्मक काम करू शकले. देशाच्या राजकारणात सतत 5 दशक वावर असणारे पवारांचे आयुष्य देशसेवेसाठी पूर्णपणे समर्पित राहीले आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत सहकार आणि राजकारणात संतुलन राखले आहे. पंतप्रधानांनी आपल्या भाषणात पवारांबरोबरील इस्त्राईल देशाच्या दौर्यातील काही प्रसंग आणि गुजरातचे मुख्यमंत्री असताना पवारांनी राज्यातील शेतीच्या विकासाची पाहणी करून कपासी सोबतच गहू उत्पादनाचा दिलेला सल्ला आदी आठवणींना उजाळा दिला.
देश्याच्या राजकरणात आघाडीवर असणार्या नेत्याला धूर्त असावेच लागते,आपले शिवाजी महाराज धूर्त नव्हते का? होतेच ना? मग पवार तर शिवरायांच्या विचारावरच चालणारे होते. आणि त्यांच्या ह्या धुर्त स्वभावा विषयीच गैरसमज पसरवण्यात विरोधक यशस्वी झाले.
त्यांच्या प्रती गैरसमज पसरविण्यास खर्या अर्थाने सुरवात झाली ती 1995 च्या विधान सभा निवडणुकीच्या आधी. पवारांवर आरोप करून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना सरकार सत्तेवर आले.
त्यावेळी गोपीनाथ मुंडे नी तर शरद पवारांचे थेट दाऊदशीच संबंध आहेत आणि आम्हाला सत्ता ध्या आम्ही त्यांच्यावर कारवाई करतो असे प्रचार सभांमध्ये जाहीर करून देखील प्रत्यक्ष्यात सत्ता आल्यावर ते काही करू शकले नाहीत.
तसे आज पर्यंत अनेकांनी पवारांवर खोटे आरोप केले. शरद पवारांवर आरोप करून चर्चेत यायच हाच मूळ हेतु त्या मागचा. किंबहुना काहींनी तर ट्रक भरून पुरावे असल्याचे देखील दावे केले परंतु सगळेच फोल ठरले.
केवळ सत्ता काबिज करण्यासाठी कायम पवारांवर आरोप करण्याचे काम सर्वांनी केले परंतु सगळ्यांना पुरून उरला तो हा सह्याद्रीपुत्र.
अगदी आताची निवडणूक देखील पवारांचे विरोधक हे खोट्या आरोपांच्या आधारावर लढण्याच्या तयारीत होते. ज्याप्रमाणे 2014 ची निवडणूक ही त्यांनी खोट्या आरोपांच्या आधारावरच लढवली,आणि सत्तेत आल्यावर मात्र काही कारवाई नाही केली, 5 वर्ष ह्यांची सत्ता असताना काही केले नाही आणि आता निवडणूक कार्यक्रम लागला की लगेच मोठ मोठे आकडे घालून भ्रष्टाचाराचे आरोप सुरू झाले.
या आरोपांमध्ये काही तथ्य नाही हे पवारांनी ईडी सारख्या संस्थेला डायरेक्ट अंगावर घेऊन दाखवून देखील दिले. पवारांनी ज्या प्रकारे ईडी चे प्रकरण हाताळले ते पाहता विरोधकांनी ज्या ईडी च्या मुद्या वरुण पवारांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावरच हा डाव उलटविण्यात पवारांना यश आले असेच म्हणावे लागेल.
आज संपूर्ण देशात अनेक माजी मंत्री,आणि दिग्गज ज्या ईडी च्या चौकशीला घाबरून आहेत त्या ईडी च्या देखील हाताला हा बाळासाहेबांचा तेल लावलेला मित्र सापडला नाही.
अश्या प्रसंगांना आव्हान देत असताना शरद पवार कदाचित असे म्हणत असतील ” तेरे हर एक वार पर मै पलटवार हूं ,युही ना कहलाता मै शरद पवार हूं.”
2 टिप्पण्या
अगदी बरोबर.... आजकालच्या लोकांना त्यांच्या केलेल्या कामाची जाणीव कमीच राहिलेली वाटत आहे ...
उत्तर द्याहटवाTrue bhai
उत्तर द्याहटवा