चांगला माणूस होता... 
खुप चांगला माणूस होता..... 
अरे काही ना काही बोलायचं होत ना त्याच्या अंत्यसंस्कार वर, 
काहीतरी बोलायचं होत ना, नसतं बोललं तर जगाला तुमच्या चांगल्यापणावर शंका आली असती. 
बर सांगा, 
चांगला होता तर, त्यांच्या चांगलेपणाचा हिशोब का नाही दिला? जेव्हा तो जिवंत होता, आठवड्यापासून तो विचारत होता ना, मग कधी त्याच्या प्रश्नांची उत्तर  का नाही दिली? 
तो विचारत होता माझ्या आयुष्यात दु:खाशिवाय अजुन काही नाही आहे, तर हसुन सांगत होते, तु ह्याव्यतिरिक्त काही अजून विचारणार का नाही
 जर ह्या विनोदी मालिकेला तोडुन बघितले असते, जर जेवढ्या वेळा त्याला निरोप दिलाय, त्याच रस्त्यावर कधी मागे वळून त्याला बघितले असतं की तो तिथून कुठे जातो?  तो घरी नव्हता जात, स्वतः ची गाडी कोणत्या तरी कानाकोपऱ्यात उभी करुन एकटा गाडीत बसून रडत असायचा, अन् म्हणायचा का चारी बाजूंनी हे दु:ख माझ्या मागे पडलयं, रडत रडतच आपल्या आईला आठवायचा अन् म्हणायचा किती दु:ख आहे, का मला एवढे दु:ख मिळतेय आई, मी एकटा आहे, तु पण मला सोडुन गेली आई
तुम्हा सर्व लोकांना माहिती होत ना, काही दिवसापासून तो वेगळं वेगळं राहात होता, लांब लांब राहत होता. बोलला तर होता तो मिळा भेटायचं, जी कोणाशी नाही केली त्या गोष्टी बोलायच्या आहेत. अन् तुम्ही बोलायचे  हा परत सुरु झाला, दोन-तीन विनोद व्हॉटस् अॅप करायचे आणि विचार करायचे तो संभाळून जाईल
चांगला माणूस होता ना समजुन जाईल
जर त्याच्या भावना समजून घेतल्या असता, जर विनाकारण त्याला मिठीत घेतलं असतं, जवळ बसवलं असतं, जर हे जाणून घेतलं असतं की दररोज जाणून बुजून विना काही खाता बेशुद्ध कसा होतो, जर हे समजुन घेतलं असतं की बोलता बोलता अचानक शांत का होतो, जर त्याच्यासाठीच त्याच्या सोबत लढले असते, त्याच्या घरातील भिंती पेक्षा जर त्याचा चेहरा वाचला असता. फक्त त्याच्या कबरीमधुन एकच आवाज येईल, की पुढच्या वेळी माझ्या वाणी कोणी भेटेल तर त्याच्यासोबत बोला, त्याला भेटा , त्याच्यावर विश्वास दाखवा, त्याच्या घरी जाऊन त्याला भेट देण, आणि त्या घाण फाशीच्या फंदाला खिडकीतुन बाहेर फेकुन द्या, तेव्हा तो जीवन जगायचं प्रयत्न करेल, तेव्हा तो आनंदी  राहायचा प्रयत्न करेल, ह्या गोष्टी आपल्या सगळ्यांना माहीत असतात,  पण आज करणं गरजेचं आहे कारण तुम्ही कोणाच्या घरी जाऊन पांढरे कपडे घालून तुम्हाला हे ना बोलायची वेळ यावी की तो एक चांगला माणुस होता
तो एक चांगला माणूस होता...