Happy Fathers day


बाप

बाळ जन्माला येते अन् जन्मदाता होतो बाप 
त्या क्षणी झालेल्या आनंदाला नाही कोणतेही माप! 
मनुष्य जेव्हा होतो बाप 
त्या बाळासाठी झेलतो कष्ट अमाप! 
बाळाला कधी आला ताप 
तर रात्रभर काळजी करतात आई-बाप
लेकरांची भूक भागवण्यासाठी कधी शेतात राबतो
तर मुलाला शिकवण्यासाठी सावकाराचे कर्ज काढतो 
आपल्या मुलांला लहानाचे मोठे करतो
त्याच्यावर चांगले संस्कार घडवतो
मुलांनी चुकां करू नये म्हणूनी त्यांना ओरडतो 
अन् त्याच्या माघारी अश्रु ओघरतो
मुलासाठी कोणतेही हाती येईल ते काम करतो
अन् मुलगा मात्र त्याच बापाला म्हातारपणी वृध्दाश्रामात धाडतो ! 
म्हातारा अडाणी बापाची लाज तो बाळगतो
तरी मुलाला जीवापेक्षा जास्त जपतो तो बाप
मुलाने काही जरी केले तरी त्याच्या मागे खंबीरपणे उभे राहतो,
अन् शेवटपर्यंत मुलामध्ये प्रेमाची आस पाहतो,
मनुष्य जेव्हा होतो बाप मुलांसाठी कष्ट झेलतो अमाप
अन् तोच मुलगा धाडतो बापाला आश्रमात !
 खूप उशीर झालेला असतो तेव्हा कळते त्या मुलाला बापाची माया,
ढसा ढसा रडतो तो जेव्हा सोडून जातो बाप आपली काया!
बाळ जन्माला येते अन् जन्मदाता होतो बाप 
त्याक्षणी झालेल्या आनंदाला नाही कोणतेही माप
अन् जेव्हा बाप सर्वकाही त्या मुलाच्या नावावर करून अनंतात विलीन होतो
त्याक्षणी केलेलं दुःख वाटते किती मोठे केलय त्या मुलाने पापं!

- शनी देशमुख