सामान्य परिस्थितीत सीमेवर तणाव असतो, तेव्हा आपण हा विचार करुन झोपी जातो की आपले भारतीय सैन्यदल ह्याच उत्तर देईल, पण मी तुम्हांला सांगु इच्छितो की ह्यावेळी फक्त सैन्यदलांने उत्तर देऊन नाही तर भारतीय प्रत्येक नागरिकांकडून उत्तर दिलं गेलं पाहिजे. भारताच्या कानाकोपऱ्यातील नागरिक काय काय करु शकतात ह्यामध्ये हे समजण्यासाठी आपल्याला समजावून घ्याव्या लागेेेल चीनच्या कुरापती आणि तो असं का करतोय. तुम्ही बघितलं असाल की हे फक्त भारतासोबत होत नाही, तर मागच्या काही दिवसापासून दक्षिण चिनी सागरामध्ये व्हेतनाम, ताइवान आणि हॉंगकॉंग ह्याच्यासोबत छेडछाणी करतोय. माझं असं विश्लेषण आहे की तो हे सगळं कोणत्याही देशासोबत दुश्मनी म्हणून नाही तर देशातील अंर्तगत समस्या सोडवण्यासाठी करतोय. आज चीनला सर्वात मोठी भिती ही त्यांच्या जनतेची आहे, त्यांची १४० कोटी जनता गुलाम असल्यागत विना मानवअधिकार सोबत चीनी तानाशाहा सरकारसाठी काम करते त्यांना श्रीमंत बनवतात. आणि जेव्हा जनता नाराज होते तेव्हा तिथे क्रांतीची परिस्थिती निर्माण होते त्याला चीन सरकार घाबरतो. आज कोरोना मुळे चीनमधील कंपन्या बंद आहे, बेरोजगारी वाढतीय, निर्यात थांबलीय त्यामुळे लोकांच्या मनात क्रांतीची परिस्थिती निर्माण होऊ शकते, म्हणून चीन शेजारील देशाशी दुश्मनी करून जनतेला एकजूट करतोय. आणि असं तो पहिल्यांदा नाही करत,, १९६२ ला पण भारताबरोबर युद्ध केलं होतं ते जनतेला एकजुट करण्यासाठी कारण त्यावेळी ४वर्ष दुष्काळ आणि भुकमारी झाली होती अन् त्यापासून लक्ष हटवण्यासाठी हे युद्ध केल होत. चीनसाठी त्यांचा GDP
वाढवणं, सुखसमृद्धी वाढवणं गरजेचं आहे. कारण ज्यादिवशी GDP कमी झाला की तिथली जनता क्रांती साठी तयार आहे. मी तर बोलतोय ह्यावेळी भारताची बुलेट पाॅवर पेक्षा वाॅलेट पाॅवर कामी येणार, जे नागरिक पैसा खर्च करतात चिनी सामान खरेदी करण्यासाठी,जरा विचार करा आपण भारतीय उद्योगला मारून, चीनकडून माेतीपासून कपड्या पर्यंत ५.२ लाख कोटीचे सामान खरेदी करतो. आणि हे सर्व पैसे पुढे जाऊन आपल्या सीमेवर हत्यारं आणि बंदुक बनुन आपल्या सैनिकांच मृत्यू च कारण बनतय. ह्यामुळे आपल्या देशाचे १३० कोटी लोक आणि बाहेरील देशातील ३ कोटी भारतीय मिळुन भारतात आणि जगभरात BOYCOTT made in China मोहीम सुरू करु, जगभरात करोनामुळे चीन विषयी रोष आहे, असं होऊ शकत पुर्ण जग सोबत येईल आणि एवढ्या मोठ्या स्तरावर चीनी उद्योगाचा boycott होईल अन् ह्यामुळे चीन ला जी सर्वात जास्त भिती आहे की त्याची अर्थव्यवस्था डगमगेल, लोकांमध्ये क्रांतीची भावना येईल त्यामुळे आंदोलन होईल व सत्ता पालट होईल. अन् आपण असं नसेल करत तर किती वाईट गोष्ट आहे भारतासाठी. जरा विचार करा एका बाजूला आपले जवान युद्ध लढत असेल आणि दुसरीकडे आपण चीनी सामान मोबाईल पासुन काॅम्पुटर, कपडयापासुन खेळणी पर्यंत खरेदी करून त्यांच्या सैनिकांना पैसा पाठवतोय, ही झाली हार्डवेअर ची गोष्ट
दुसरीकडे आपले युवा चिनी साॅफ्टवेअर Application, games, Tiktok ,share it ह्या सर्व गोष्टी वापरून करोडो करोडोचा पैसा चीनला पाठवतोय. ह्यामुळे खुप गरजेच आहे आपल्या नागरिकांनी उत्तर देणं
#BoycottmadeinChina
Software in week
Hardware in year
हे आपण स्वतः करुन शेकडो लोकांना ह्या विषयी समजवून शेअर करा
1 टिप्पण्या
Ok
उत्तर द्याहटवा