" सुप्रसिद्ध विद्वान इतिहासकार रावबहाद्दूर चिं. वि. वैद्य म्हणतात‚ ‘ही लोकोत्तर स्त्री आपल्या अनंत गुणसमुच्चयामुळे मानव जातीचे भूषण ठरली. बुद्धी इतकी कुशाग्र की प्रत्येक कार्यात त्या हुशार व निपुणच ठरत. धर्मनीतीच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी आपले नाव अजरामर केले. दानधर्म तर इतका प्रचंड की आजवर कुणी केला नाही. न्यायदान इतके अचूक की दोन्ही बाजू त्यांना दुवा देत जात. राजकारणाची जाण व झेप असामान्य !’ एका पत्रात त्या लिहितात‚ ‘‘चारही बाजूंनी आपला प्रसार करण्याची योजना फिरंग्यांनी आखलेली दिसते. कुठे दोन तर कुठे तीन पलटणी उभ्या करून फिरंगी पाय रोवतो आहे. अशा वेळी फौजा पाठवून त्याला वेळीच गारद केले पाहिजे. म्हणजे त्यास जरब बसेल. नवाब‚ भोसले‚ शिंदे-होळकर या सर्वांनी मिळून फिरंगी ठेचला पाहिजे.’’ दूरदृष्टीची त्यांना जणू देणगीच होती."
महाराणी अहिल्यादेवी होळकर*
 यांच्या 295 व्या जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा