मराठी चित्रपटांचा बादशहा!!!
आपल्या उत्तुंग अभिनयाने रसिकांना हसवणारा, रडवणारा ...
खरं तर आज गल्लीमध्ये अशोकसराफमय वातावरण आहे. प्रत्येकांनी इतकं छान छान लिहिलं आहे की सकाळपासून तेच वाचन चालू आहे. या महान अभिनेत्या विषयी काय लिहू? 
त्यांच्या अभिनयाचा अगदी लहानपणापासूनच चाहता होतो मी खलनायकी, विनोदी, इरसाल, हजरजबाबी सर्व भूमिका अगदी मन लावून पाहिल्या आणि आजही त्या मनावर कोरून ठेवलेल्या आहेत. 
गंमत जम्मत मध्ये वर्षा उसगांवकर सचिनला धडक देते त्या प्रसंगात आधी या दोघांचे किडनॅपिंग बद्दल बोलणं चालू असतं आणि सचिन आणि वर्षा भांडत असताना अशोक मामांच्या डोक्यात येतं की आपण हिलाच पळवून नेलं तर? आणि हेच सचिनला ते फक्त मुद्राभिनयाने सांगतात! 
अशक्य सीन केलाय तो त्यांनी!
अफाट क्षमता असणारे कलाकार आहेत अशोक मामा
त्यांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा