“जो जे वांछील, तो ते लाहो” असे सांगत संपूर्ण जगाची काळजी वाहणाऱ्या संतशिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! भागवत धर्माचा, वारकरी सांप्रदायाचा पाया रचणाऱ्या, अध्यात्माच्या क्षेत्रात समानता, लोकशाही आणणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या चरणी भावपूर्ण वंदन! संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवद्गीता मराठीतून लिहिली, गीतेतला भावार्थ सामान्यांना समजेल अशा मराठीत सांगितला. ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला जीवनाचा सार सांगताना त्याला विचार करण्याची शक्तीही दिली, समाजात बरोबरीचं स्थान मिळवून दिलं. ‘माझा मराठाचि बोलू कौतुके। परि अमृतातेहि पैजासी जिंके। ऐसी अक्षरे रसिके। मेळवीन।’ मराठी भाषेची अशी महती सांगणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींना त्रिवार वंदन!
0 टिप्पण्या