चित्रकार, नाटककार, कादंबरीकार, कवी, संगीतकार असलेल्या गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांचा कार्यकाळ 19 व्या शतकाच्या उत्तरार्धात व 20 व्या शतकाच्या प्रारंभी होता. त्यांच्या कार्यामुळे बंगाली साहित्यात व बंगाली संगीतात एक आमूलाग्र बदल घडून आला. रवींद्रनाथ हे भारताचे व आशियातील पहिले नोबेल पुरस्कार विजेते होते.
शांतिनिकेतनाची उभारणी, विस्तृत व उच्च दर्जाच्या साहित्याची निर्मिती, सृजन संगीत हे रवींद्रनाथांचे प्रमुख जीवनकार्य होय. त्यांनी रचलेल्या 'जन गण मन' व 'आमार शोनार बांग्ला' या रचना अनुक्रमे भारत व बांग्लादेश या देशांची राष्ट्रगीते म्हणून स्वीकारण्यात आल्या आहेत. दोन राष्ट्रगीतांचे जनकत्व असलेले रवींद्रनाथ हे पृथ्वीवरील एकमेव कवी आहेत.
त्यांची आज पुण्यतिथी. यानिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन!
0 टिप्पण्या