जॅकी चॅन चे अनमोल विचार
जगभरात आपल्या एक्शनसाठी प्रसिद्ध जॅकी चॅनचे चाहते प्रत्येक देशात आहेत.
पण तुम्हाला माहीत आहे का, एक्शन स्टार असुन जॅकी चॅन एक चांगला माणूस पण आहे.
जॅकी चॅनने जगभरात गरीबांसाठी दवाखाने आणि शाळा सुरु केल्या.
जॅकी चॅन UNICEF आणि UNAIDS सारख्या सामाजिक संस्थेसोबत पण जोडले गेले आहेत,
या जरा आपण जाणुन घेऊयात त्यांच्या विचारांबद्दल.
" मी काही गोष्टीसाठी चांगला आहे, आणि खुप गोष्टीसाठी वाईट आहे. "
" मी आता म्हातारा झालो आहे, मी समजतो की मला स्वीकारलं पाहिजे की मी कोण आहे. "
" परिवार तो नाही जो स्वतः कडे ( रक्ताचं नात )आहे, परिवार तो आहे ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता आणि जो तुमच्यावर प्रेम करतो. "
" मला फक्त एवढंच वाटतं की माझ्या कामामुळे लोक खुश व्हावेत. "
" जेव्हा मी स्टंट करतो तेव्हा लोक मला प्रश्न विचारतात, की तुम्ही घाबरला होता का, त्यात काही शंकाच नाही की मी घाबरलो होतो मी काही सुपरमॅन नाही. "
" मी जॅकी चॅन कसा बनलो, जेव्हा सगळे झोपायचं तेव्हा मी प्रशिक्षण घ्यायचो. "
" मी लढून थकलो आहे, मला माहिती आहे की मी आयुष्यभर एक्शन स्टार नाही राहु शकत. "
" मला कधीच वाटत नव्हतं की मी पुढचा ब्रुस ली व्हावं, मला फक्त पहिला जॅकी चॅन बनायचे होत. "
"
मी छोट्या गोष्टी करतो, मी दररोज चांगल्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो, जर प्रत्येकांनी थोडीफार चांगल्या गोष्टी केल्या तर जग किती चांगलं होईल."
0 टिप्पण्या