छत्रपती शिवाजी महाराजांची प्रेरणा
" या उर्जेचा जर आपण स्रोत पाहिला
तर आपल्या लक्षात येईल की
या संपुर्ण उर्जेमागे तीन अक्षरे दडली आहेत ती आहेत म्हणजे शिवाजी.
महाराजांच निधन झालं १६८० ला, आणि १६८१ ला औरंगजेब महाराष्ट्रात आला,
पुढे जर समजा आपण १६८१ ते १७०७ हा कालखंड आख्खा २७ वर्षाचा हा औरंगजेब महाराष्ट्रामध्ये होता.
त्या संपुर्ण काळामध्ये संभाजी राजाचं त्याच्यासोबत युद्ध झालं,
ताराराणी साहेब, संताजी धनाजी, राजाराम महाराज हे सगळं २७ वर्ष चालू होत
आणि या २७ वर्षामध्ये औरंगजेबनी जे पत्र पाठवली आहेत
त्यामध्ये त्यांनी असं लिहलय की, अर्थात त्यांना माहीत होत की शिवाजी महाराज नाही आहेत,
पण त्या २७ वर्षाच्या अख्या कालखंडात जो काही त्यांना महाराष्ट्रात विरोध झाला, लढाया झाल्या,
त्याचं वर्णन औरंगजेबनी असं केलय की शिवाजी मला अजुन छळतोय
ती जी पुढे लढण्याची प्रेरणा आहे, त्या प्रेरणेला औरंगजेब शिवाजी म्हणतोय,
आणि मला असं वाटतय की ती अजूनपर्यंत त्या प्रेरणेवरती महाराष्ट्र उभा आहे.
आणि जर समजा तुम्ही पेशवे जरी घेतले तरी त्याच प्रेरणेवरती आहेे,
संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास जरी पाहिला तरी तो त्याच प्रेरणेवरती आहे
आणि अजूनपर्यंत तरी तीच एक प्रेरणा आपण सर्व जन पुढे घेऊन चाललो आहोत,
आणि महाराष्ट्रचं नशीब की इतकी मोठी व्यक्ती महाराष्ट्रामध्ये जन्माला आली आणि त्यांनी ती प्रेरणा देशाला दिली."
0 टिप्पण्या