भावपूर्ण श्रद्धांजली!
भारताचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनाने भारतीय राजकारणाचा मार्गदर्शक हरपला आहे. प्रणव मुखर्जी म्हणजे राजकारणातील सभ्यताच. पक्षीय राजकारणाच्या पलीकडे जाऊन त्यांनी पाच दशकाहून अधिक काळ राजकीय क्षेत्रात राहून देशवासियांची सेवा केली. त्यांच्या या कार्यामुळेच त्यांना सर्वोच्च अशा 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रणव मुखर्जी यांनी 1969 साली राष्ट्रीय राजकारणात काम करण्यास सुरुवात केली. इंदिरा गांधी, राजीव गांधी, डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये प्रणव मुखर्जी यांनी अर्थमंत्री, संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री म्हणून काम केले आहे.
2012 मध्ये झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी ते उभा राहिले आणि भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून निवड झाली.
'प्रणव दा' या टोपण नावाने ते सर्वांना परिचित होते. त्यांच्या निधनाने भारताच्या राजकारणातील एका युगाचा अंत झाला आहे. त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो! भावपूर्ण श्रद्धांजली!
#भारतरत्न #माजीराष्ट्रपती #प्रणवमुखर्जी #भावपूर्णश्रद्धांजली
0 टिप्पण्या