सुनील सिकंदरलाल कपूर आज 67 वर्षांचा झाला

म्हणजे आपला शक्ती 'आऊ' कपूर 

आपल्या करियरची सुरुवात छोट्या भूमिकेतून करताना सुनील कपूर ला हेरलं सुनिल दत्तजीनी आणि रॉकी मध्ये व्हीलनचा रोल ऑफर केला . संजुबाबा समोर उभ्या ठाकणाऱ्या  RD ह्या व्हीलनचं सुनील सिकंदरलाल कपूर हे नांव त्यांना मिळमिळीत वाटलं म्हणून त्याचं नामकरण करण्यात आलं शक्ती कपूर!

कुर्बानी, रॉकी , हिम्मतवाला, हिरो अश्या सिनेमातून शक्ती कपूरची खलनायकी इनिंग सुरू झाली त्यानी हिरो म्हणून सुद्धा एक सिनेमा केला होता पण तो पडला. सत्ते पे सत्ता मध्ये त्याने छोटी पण चांगली भूमिका केली होती

नंतर त्याने खलनायकी भूमिकांसोबत विनोदी भूमिका करायला सुरुवात केली त्यातील राजा बाबू मधील नंदू सबका बंधू साठी त्याला फिल्मफेअर अवॉर्ड सुद्धा मिळाले होते. 

अख्खं आयुष्य कुठल्या न कुठल्या वादात गुंतलेल्या शक्ती कपूर ने शिवांगी कोल्हापूरे सोबत प्रेमविवाह केला होता तो मात्र टिकवला.

शक्ती कपूरच्या इतक्या विवादित गोष्टी असूनही त्याला फिरोज खान , प्रियदर्शन , पद्मालय फिल्म्स आणि डेव्हिड धवन कायम आपल्या चित्रपटात घेत राहिले.

कादरखान असरानी आणि शक्ती कपूर असं त्रिकुट असणारे साऊथ चे जवळपास 100 एक सिनेमे आहेत.

कादर खान आणि शक्ती कपूर ही भन्नाट जोडगोळी खूप धमाल करत असत त्यांचा बाप नंबरी बेटा दस नंबरी ह्या सिनेमात जॅकी आणि आदित्य पंचोली हे केवळ तोंडी लावण्यापूरतेच आहेत आख्खा सिनेमा ह्या दोघांच्या उपदव्यापाने व्यापलेला आहे.

राजकुमार संतोषी च्या अंदाज  अपना अपना या कल्ट सिनेमा साठी मोग्याम्बो च्या भाच्याची , क्राईम मास्टर गोगो ची भूमिका कुणीतरी दुसरंच करणार होतं पण काही कारणाने ही भूमिका शक्तीच्या गळ्यात पडली आणि त्याने खरंच ही भूमिका अजरामर केली.

अखिल भारतीय चित्रपटीय बलात्कारी संघटनेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री शक्ती कपूर साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.

आऊsssss!

Caricature of crime master Gogo

Color pencils and pen on A4 paper

#happybirthday

#ShaktiKapoor

#CrimeMasterGogo