.
स्पायडरमॅन, सुपरमॅन, बॅटमॅन यांच्यासारख्या सुपरहिरोंच्या विश्वात 2018 मध्ये एक मोठा सूर्य अधिक प्रखर झाला, जेव्हा ‘ब्लॅक पँथर’ नावाचा पहिलावहिला कृष्णवर्णीय सुपरहिरो मूव्ही प्रदर्शित झाला.
खरंतर ब्लॅक पँथर हे पात्र त्यापूर्वीच 2016 मध्ये पहिल्यांदा पडद्यावर झळकलं होतं – ‘कॅप्टन अमेरिका: द सिव्हिल वॉर’मध्ये… पण अवघ्या तीन वर्षांत त्याला स्वतःचा एक अख्खा सिनेमा मिळाला, आणि यासाठी जगभरातून मार्व्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सच्या निर्मात्याचं कौतुक झालं.
गेल्या काही काळात अमेरिकेत तसंच जगभरात बदलत चाललेल्या सामाजिक परिस्थितींमध्ये एका कृष्णवर्णीय व्यक्तीला सुपरहिरो म्हणून बघणं ही एक मोठी सामाजिक दरी ओलांडणं होतं. त्यामुळेच टाईम मॅगझीनने या सिनेमाला ‘मैलाचा दगड’ म्हटलं होतं.
खरंतर त्यापूर्वी काही वेळा 'काळे' सुपरहिरो हॉलिवुडने पाहिले होते खरे, पण मुख्य प्रवाहात येणारा ब्लॅक पँथर पहिलाच.
या 2018च्या सिनेमात ज्या अभिनेत्याने मुख्य भूमिका साकारली होती, त्या चॅडविक बोसमन यांचं निधन झालं. 43 वर्षांचे बोसमन यांना स्टेज 3 कोलन कॅन्सरचं निदान झालं होतं. त्यात त्यांचं अमेरिकेतील लॉस अँजेलिसमधल्या घरात निधन झालं.
“चॅडविक एक खरा लढवय्या होता, ज्याने सारंकाही झेलून तुमच्यासाठी असे काही सिनेमे आणले, ज्यांच्यावर तुम्ही आजही प्रेम करता,” असं त्यांच्या कुटुंबीयांनी एका निवेदनात त्यांच्या मृत्यूची घोषणा करताना म्हटलं.
चॅडविक बोसमन यांचा ब्लॅक पँथर आणखी एका कारणासाठी महत्त्वाचा ठरला – 2018च्या ऑस्करच्या सर्वोत्कृष्ठ चित्रपटाच्या पुरस्कारांसाठी नामांकित होणारा तो पहिला सुपरहिरो सिनेमा ठरला.
#ChadwickBoseman #BlackPanther #RIPBlackPanther #HollywoodNews #चॅडविकबोसमन #ब्लॅकपँथर #अर्कचित्र #चित्रकला #caricature #drawing #व्यंगचित्र
0 टिप्पण्या